dcsimg

बाभूळ ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
बाभूळ
 src=
बाभळीची पिवळी फुले

बाभूळ (Acacia) हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातला एक विशाल वाढणारा वृक्ष आहे. बाभळीचे लाकूड कठीण असते. बाभळीच्या खोडाला छेद केल्यास त्यातून डिंक स्रवतो. हा उत्तम प्रकारचा डिंक पाैष्टिक असल्याने त्याचा कूट करून त्यापासून बनवलेले लाडू बाळंतिणीला खायला घालतात.

तो वृक्ष नसतो तेव्हा त्याला वेडी बाभळ म्हणतात. घरांना-शेतांना वेड्या बाभळीच्या काटेरी झुडपांचे कुंपण घालतात.

बाभळीवी अन्य नावे : बब्बूळ, बब्बूल, बर्बुर (संस्कृत), कीकर, बाबुल (हिंदी), बावळ (गुजराथी), शमीरूकु (कोंकणी), कुरूवेलम (मल्याळम), करूवेल (तेलुगू) वगैरे

बाभळाच्या जाती

  • गावठी गाभूळ
  • देवबाभूळ (केसुरडी बाभळ, किंकिरात, कासेबाभूळ, कोकई)

उपयोग

बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा (काड्यांचा) उपयोग दात घासण्यासाठी करतात. या वृक्षास श्रावण महिन्यात सुंदर पिवळी फुले येतात. याचा पाला बकऱ्यांचे व मेंढ्यांचे एक आवडते खाद्य आहे. बाभळीच्या काही उपजातींचा लाकडी सामान बनवण्यासही उपयोग होतो.

बाभूळ हे झाड शेतकरी व शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

मराठी साहित्यात बाभूळ

अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यात बाभूळ येते. उदा०

लवलव हिरवीगार पालवी - काटयांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी
झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे,
या साऱ्यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी (अपूर्ण)

- इंदिरा संत

अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभूळझाड उभेच आहे -
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसुन बोटे
बाभूळझाड उभेच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभूळझाड उभेच आहे (अपूर्ण)

--वसंत बापट

कांट्यांनी भरलें शरीर अवघें, छाया नसे दाटही
नाहीं वास फुलांस, भूक न निवे ज्याच्या फळें अल्पही
नाहीं एकही पांथ येत जवळीं, तूझ्या असो गोष्ट ही
अन्याचीं न फळेंं मिळोत म्हणुनी होशी तयांतें वही

--कृष्णशास्त्री चिपळूणकर

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

बाभूळ: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= बाभूळ  src= बाभळीची पिवळी फुले