dcsimg

चिंच ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

चिंच (शास्त्रीय नाव : Tamarindus indica, टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील वनस्पती आहे.

लागवड

1) चिंच लागवडी विषयी(जमिन स्वरूपाची आहे)

  • रोपे कोणत्या जातीची असावित
  • रोपे कोठे व किती दराने मिळतील
  • खड्यांचे स्वरूप व खड्डे भरण्याची पद्धत
  • लागवड कोणत्या महिन्यात करावी
  • उन्हाळ्यात पाण्याची गरज भासते का?
  • बाजार पेठे विषयी माहिती द्यावी
  • चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
  • सध्या शासनाची कोणती योजना आहे का?

चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार करून केली जाते. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावावे आणि लगेच पाणी द्यावे.

चिंच जात- प्रतिष्ठान, आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10, सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर 40 रु. प्रती कलम दराने उपलब्ध आहेत. फोन संपर्क – 02112-254313 किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधावा.

महत्त्वाचा किडी आणि त्यांचे नियंत्रण - चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छीद्रामध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.

फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.[१] चिंच हे पितळेची भांडी चमकवन्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची चटणी खूप स्वादिष्ट बनते.

पहिला चिंच महोत्सव

औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ सुरुवात झाली.[२]

इंग्लिश चिंच

इंग्रजी चिंच या झाडालाच 'चिंचबाई' पण म्हणतात. याचा मोठा वृक्ष असतो. झाडाला काटे असतात. फांद्या जाळण्यासाठी वापरतात. बकऱ्या-शेरड्या (शेळ्या) पाला खातात. उन्ह्याळ्यात चिंचाच लागतात. पिकल्यावर खायला खूप छान गोड लागतात. मोठी माणसे, पोरे, बकऱ्या या चिंचा खातात. काही लोक मुद्दाम या चिंचेच्या आवडीने हे झाड घरात लावतात. बी खाली पडले तर झाड 'वापते' (उगवते.)

आहारातील स्थान

चिंच हि चविनी आबंट असते. गावाकडे चिंच सहज ऊपलब्ध होते. मात्र, शहरात चिंच सहजा सहजी मिळत नाही. ती, विकत घेऊनच खावी लागते.

चिंचेचा वापर हा जेवणामध्ये पान केला जातो 

गुणधर्म

  • चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.

साहित्य आणि संस्कृतीतील स्थान

  • प्रसिद्ध गीत: चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी ! (गीत ग.दि.माडगूळकरचित्रपट मधुचंद्र १९६७, स्वर महेन्द्र कपूर ,संगीत एन दत्ता)[३]

संदर्भ

  1. ^ http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=3976
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/2841612.cms
  3. ^ http://www.marathijagat.net/chitrapat-geete/set-nine/he-chincheche-jhhad.html
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

चिंच: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

चिंच (शास्त्रीय नाव : Tamarindus indica, टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील वनस्पती आहे.

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक