पाल (शास्त्रीय नाव: Hemidactylus frenatus, हेमीडॅक्टिलस फ्रेनाटस ; इंग्लिश: Common House Gecko, कॉमन हाउस गेको ;) हा सरड्यांचा गटातील प्राणी आहे. मूलतः आग्नेय आशिया व उत्तर आफ्रिका खंडांतला हा प्राणी पॅसिफिक गेको, आशियाई गेको अश्या नावांनीही ओळखला जातो. हा निशाचर प्राणी असून निवासी इमारतींमधील दिव्यांजवळ घिरणारे किडे खाण्यासाठी घराच्या, इमारतींच्या भिंतींवर पाली रात्री हिंडताना आढळतात.